बीड : बीडमध्ये दहशत माजवणाऱ्या सतीश भोसले उर्फ खोक्याला वन विभागाच्या कोठडीमध्ये मारहाण झाल्याची माहिती समोर आली आहे.
सतीश भोसलेला गुरूवारी वन विभागाने ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर त्याला वन विभागाच्या कोठडीमध्ये ठेवण्यात आले होते. या कोठडीमध्ये त्याला मारहाण करण्यात आली असल्याचे म्हटले जात आहे. सतीश भोसलेच्या पाठीवर वळ असलेले फोटो समोर आले असून ते व्हायरल होत आहेत.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, बीडमध्ये ढाकणे पिता-पुत्राला मारहाण केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या खोक्याला वन विभागाच्या कोठडीत मारहाण झाली. खोक्याच्या वकिलाने हा दावा केला आहे.
त्यानंतर खोक्याची रवानगी न्यायालीन कोठडीत करण्यात आली. मारहाण झाल्याने खोक्या प्रकरण गंभीर झाले आहे. खोक्याला मारहाण झाल्याचे फोटो व्हायरल झाले आहेत. या मारहाणीनंतर सतीश भोसलेला पुन्हा न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले.
सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या राहत्या घरी वन विभागाने केलेल्या कारवाईमध्ये वन्य प्राणी पकडण्यासाठी लागणारे जाळी, वन्य प्राण्यांच्या शिकार करण्यासाठी लागणारे हत्यारे त्याचबरोबर मांस आढळून आले होते. या प्रकरणी वनविभागाने सतीश भोसले आणि त्याच्या सहकाऱ्यांवरती वन कायदे अंतर्गत गुन्हा दाखल केला होता.
पोलिसांच्या ताब्यात असलेल्या खोक्याला गुरूवारी दुपारी वन विभागाने ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर त्याला वन विभागाच्या कोठडीत ठेवण्यात आले होते. याच कोठडीत त्याला मारहाण करण्यात आली. या मारहाणीचे फोटो व्हायरल झाले आहेत.
खोक्याला वन विभागाच्या कोठडीत कोणी मारहाण केली? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. खोक्याला मारहाण झाल्यानंतर त्याच्या वकिलाने त्याला न्यायालयीन कोठडी देण्यात यावी अशी मागणी केली. वकिलाची ही मागणी मान्य करण्यात आली त्यानंतर त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली.