आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नेत्यांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे. अशातच बीडमध्ये भाजपला मोठा धक्का बसणार आहे. बीडच्या आष्टी विधानसभा मतदारसंघातील बडा नेता अजित दादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
बीडमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते माजी आमदार भीमराव धोंडे अजित दादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून ते पक्षाची साथ सोडणार असल्याची चर्चा होती. मात्र, आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, माजी आमदार भीमराव धोंडे शक्ती प्रदर्शन करत उद्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी प्रवेश करणार आहेत. सहकार आणि शिक्षण क्षेत्रामध्ये मोठे योगदान असलेल्या भीमराव धोंडे यांच्या प्रवेशामुळे आष्टी मतदारसंघात भाजप आमदार सुरेश धस यांचे डोकेदुखी वाढणार असल्याचं बोललं जात आहे.