बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी हत्या झाल्याची घटना घडली आहे. मात्र या घटनेमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. अशातच सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमागे राजकीय कनेक्शन असल्याच्या चर्चाना उधाण आलं आहे.
दरम्यान, आता पंकजा मुंडे यांनी संतोष देशमुख हत्ये प्रकरणी एक भाष्य केलं आहे, ज्याची सगळीकडे एकच चर्चा सुरु आहे.
नेमकं काय म्हणाल्या पंकजा मुंडे ?
संतोष देशमुख हा माझा बूथप्रमुख होता. हे प्रकरण घडलं त्यावेळेस गोपीनाथ गडावरुन पहिली एसआयटीची मागणी मी केली होती. सध्या मुख्यमंत्री आणि गृहमंत्री सुद्धा देवेंद्र फडणवीसच आहेत आणि ते लेकराला नक्की न्याय देतील आणि त्यांच्या घरच्यांना सुद्धा न्याय देतील असं देखील पंकजा मुंडे म्हणाल्या.