हृदयद्रावक... ! जन्मदात्या आईला लोखंडी पाईपच्या सहाय्याने बेदम मारहाण ; उपचारादरम्यान मृत्यू
हृदयद्रावक... ! जन्मदात्या आईला लोखंडी पाईपच्या सहाय्याने बेदम मारहाण ; उपचारादरम्यान मृत्यू
img
Dipali Ghadwaje
बीड :  मुलाने जन्मदात्या आईला लोखंडी पाईपच्या सहाय्याने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना बीडमध्ये समोर आली आहे. बीडच्या धारूर तालुक्यातील तरनळी गावात ही घटना घडली. या घटनेमुळे बीडमध्ये खळबळ उडाली आहे. 


याबाबत मिळालेल्या माहितीनुसार ,  या हल्यात डोक्याला गंभीर दुखापत झालेल्या या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सुवर्णमाला बांगर असं हत्या करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी आरोपी मुलाला पोलिसांनी अटक केली.

नेमकं काय घडलं?
सुवर्णमाला आपल्या घरासमोर बसल्या असताना त्यांचा मुलगा दत्ता बांगरने त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. घरात जाऊन त्याने लोखंडी पाईप आणला आणि आईला मारहाण करत डोक्यावरही हल्ला केला. मारहाण करताना दत्ताचा लहान मुलगा तिथेच होता. मुलासमोरच त्याने आपल्या आईला संपवलं. यावेळी त्यांच्या बाजूला असलेल्या भावजाईला देखील दत्ता बांगरने जीवे मारण्याची धमकी दिली.

रक्तबंबाळ झालेल्या सुर्णमाला बांगर यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. पण प्रकृती गंभीर असल्यामुळे पुढील उपचारासाठी त्यांना अंबाजोगाई येथील स्वादाती रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

या प्रकरणात दत्ता बांगर याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला पोलिसांनी अटक केली. आरोपीला न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.
इतर बातम्या
Join Whatsapp Group