संतोष देशमुख हत्या प्रकरण; औरंगाबाद खंडपीठानं वाल्मीक कराडचा जामीन अर्ज फेटाळला
संतोष देशमुख हत्या प्रकरण; औरंगाबाद खंडपीठानं वाल्मीक कराडचा जामीन अर्ज फेटाळला
img
वैष्णवी सांगळे
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख खून खटल्यातील मुख्य आरोपी वाल्मीक कराडचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने फेटाळला आहे. न्या. सुशील घोडेस्वार यांनी बुधवारी (ता. 17) हा फेटाळला. यानंतर संतोष देशमुख यांचे बंधु धनंजय देशमुख यांनी प्रतिक्रिया देत न्याय व्यवस्थेवर विश्वास असल्याचे सांगत आता आपल्याला न्याय मिळायला सुरवात झाल्याचे म्हटले आहे.

संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख खून खटल्यात मुख्य आरोपी वाल्मीक कराड याला मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने मोठा झटका दिला आहे. न्यायालयाने कराडचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.

शुक्रवारी ज्येष्ठ विधिज्ञ शिरीष गुप्ते यांनी कराडच्या वतीने तब्बल सहा तास प्रदीर्घ युक्तिवाद केला होता. त्यांनी पोलिसांच्या तपासावर आणि अटकेच्या कायदेशीर प्रक्रियेवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. मात्र मंगळवारी झालेल्या सुनावणीत सरकार पक्षातर्फे मुख्य सरकारी वकील अमरजितसिंह गिरासे आणि फिर्यादी पक्षातर्फे ॲड. नितीन गवारे यांनी आरोपींचे मुद्दे खोडून काढले.

सुनावणीवेळी आरोपीचे वकील यांनी सदर गुन्हयातील तपासाबाबत काही आक्षेप नोंदविले. त्यांनी न्यायालयास विनंती केली की, सदर प्रकरणाची दोष निश्चिती १९ डिसेंबरला असून, त्यांच्या दोष मुक्तीचा अर्ज उच्च न्यायालयात सुनावणीसाठी प्रलंबित आहे. तोपर्यंत कराड यांच्या दोष निश्चितीला स्थगिती देण्याचे आदेश बीडच्या विशेष न्यायालयाला द्यावेत, अशीही विनंती आरोपीच्या वकिलांनी केली.

मात्र मुख्य सरकारी वकील आणि फिर्यादीचे वकील ॲड. नितीन गवारे यांनी सरकारची बाजू भक्कमपणे मांडली. त्यांनी पुराव्यांच्या आधारे आरोपीचे सर्व दावे खोडून काढले. 'मकोका' अंतर्गत झालेली कारवाई योग्य असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
Beed |
इतर बातम्या
Join Whatsapp Group