मोठी बातमी : संतोष देशमुख खून प्रकरणात मोठी अपडेट ; चौथ्या मास्टरमाइंडला अटक
मोठी बातमी : संतोष देशमुख खून प्रकरणात मोठी अपडेट ; चौथ्या मास्टरमाइंडला अटक
img
Dipali Ghadwaje
संतोष देशमुख खून प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे.  बीडमधील माजी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील चौथा प्रमुख आरोपी विष्णू चाटेला पोलिसांनी अटक केली. बीडमधूनच त्याला अटक करण्यात आली आहे.

विष्णू चाटे याप्रकरणातील मुख्य सूत्रधारांपैकी एक आहे. बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे माजी सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली होती. 

याप्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला. ते आपल्या कारमधून जात असताना काही अज्ञातांनी त्यांची कार अडवली आणि त्यांचे अपरहण करत हत्या केली होती.

या घटनेमुळे मस्साजोगचे ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. तसंच या प्रकरणामुळे राजकारण देखील तापले आहे. संसदेपर्यंत हे प्रकरण पोहचले आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात आतापर्यंत ३ जणांना अटक करण्यात आली होती. आता चौथ्या आरोपीला आज अटक करण्यात आली आहे.

बीड पोलिसांनी विष्णू चाटे याला अटक केली. या प्रकरणातील मास्टरमाइंड म्हणून विष्णू चाटेला अटक करण्यात आली. विष्णू चाटेची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. तसंच, पवनचक्की अधिकाऱ्यांना खंडणी मागितल्याच्या आरोपाखाली देखील विष्णू चाटेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीडमधून विष्णू चाटेला अटक करण्यात आली असून पोलिस त्याची चौकशी करत आहेत. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group