अजित पवारांच्या ताफ्यातील वाहनाने दुचाकीला उडवले, ४ जण गंभीर
अजित पवारांच्या ताफ्यातील वाहनाने दुचाकीला उडवले, ४ जण गंभीर
img
वैष्णवी सांगळे
एक मोठी बातमी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्यातील वाहनाचा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. यात ४ जण गंभीर जखमी झाल्याचे समोर आले आहे. बीड जिल्ह्यात तेलगाव-धारूर रस्त्यावर धुनकवाड येथे हा अपघात झालाय. 

अजित पवारांचा ताफा तेलगावहून केजकडे जात होता. यावेळी धुनकवड फाट्याजवळ अजित पवार यांच्या ताफ्यातील MH 02 GH 5732 या वाहनाचे एका दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील विष्णू दामोदर सुदे, त्यांची पत्नी आणि दोन मुली गंभीर जखमी झाले आहेत. यातील जखमींवर रुग्नालयात उपचार सुरु आहेत. 

या अपघातानंतर चारचाकी वाहन पलटी झाल्याचीही माहिती समोर आली आहे. या अपघाताचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

हा अपघात इतका भीषण होता की दुचाकीचा चुराडा झाला आहे. तसेच ताफ्यातील वाहनाचेही मोठे नुकसान झाले आहे. या अपघातात अजित पवारांचा सुरक्षा रक्षकही जखमी झाला आहे. त्याच्यावरही उपचार सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group