सौदी अरेबियात झालेल्या भीषण अपघाताची माहिती समोर आली आणि सर्वत्रच एकच खळबळ उडाली. या अपघातात ४५ भारतीयांचा मृत्यू झाला. धार्मिक कार्यासाठी सौदी अरेबियाला गेलेल्या भाविकांवर काळाने घाला घातला आणि क्षणात होत्याचं नव्हतं केलं. हज यात्रा पूर्ण झाल्यानंतर कुटुंबिय घराच्या दिशेने निघाले मात्र हा प्रवास त्यांचा अखेरचा ठरला. भक्तांच्या बसने एका डीझेलने भरलेल्या टँकरला धडक मारली आणि क्षणात सर्वकाही संपलं.
या अपघातात हैदराबाद येथील एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कारण कुटुंबाने एकाच वेळी १८ जवळच्या लोकांना गमावलं आहे. यामध्ये एकाच कुटुंबातील तब्बल तीन पिढ्यांचा अंत झाला आहे. १८ स्वप्ने, १८ जीवने आणि १८ कथा जागीच संपल्याय.
कुटुंबातील सदस्यांची हज यात्री हैदराबाद येथील मुसीराबाद येथे राहणाऱ्या शे नसीरुद्दीन आणि पत्नी अख्तर बेगम यांच्या कुटुंबासाठी दुःखाची लाट होऊन आली. या अपघातात त्यांचा मुलगा, दोन मुली, सुना आणि इतर सदस्यांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेमुळे एकाच कुटुंबातील तब्बल तीन पिढ्यांचा अंत झाला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे कुटुंबात दुःखाचा डोंगर कोसळला आहे..