धक्कादायक : ड्युटीवर असताना डॉक्टर झोपला , उपचाराअभावी अपघातग्रस्ताचा मृत्यू, कुठे घडली घटना?
धक्कादायक : ड्युटीवर असताना डॉक्टर झोपला , उपचाराअभावी अपघातग्रस्ताचा मृत्यू, कुठे घडली घटना?
img
Dipali Ghadwaje
एका ३० वर्षीय व्यक्तीचा अपघात झाला , अपघातानंतर लगेचच त्याला जवळच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र वेळेवर उपचार न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना मेरठमध्ये घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार , या ३० वर्षीय व्यक्तीचा अपघात झाला,  अपघातानंतर लगेचच त्याला जवळच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात दाखल केल्यानंतर व्यक्तीला आपत्कालीन वॉर्डमध्ये ठेवण्यात आले, पण त्याच्याकडे दुर्लक्ष केल्याने रक्तस्त्राव होऊन त्याचा जीव गेल्याचे म्हटले जात आहे.  

एका वृत्त संस्थेने दिलेल्या माहितीनुसार,  वेळेवर उपचार न मिळाल्याने  या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचा आरोप आता केला जात आहे. मेरठच्या लाला लजपत राय मेमोरियल मेडिकल हॉस्पिटल अँड कॉलेज या रुग्णालयात ३० वर्षीय सुनील कुमार यांना अपघातानंतर उपचारांसाठी आपत्कालीन वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले होते.

पण तेव्हा ड्युटीवर असलेले डॉक्टर झोपले होते. तासभरात सुनील यांना वॉर्डमध्ये ठेवण्यात आले. रक्तस्त्राव होऊन सुनील कुमार यांचा आपत्कालीन वॉर्डमध्ये मृत्यू झाला.

ड्युटीवर असलेल्या मेडिकल कॉलेजमधील ज्युनियर रेसिडेंट डॉक्टरचा एसीसमोर झोपलेला कथित व्हिडीओ समोर आला.

त्यानंतर निष्काळजीपणाच्या आरोपाखाली ज्युनियर डॉक्टरला निलंबित करण्यात आले. रुग्णालय प्रशासनाने सदर व्हिडीओची दखल घेतली आहे आणि संबंधिज  डॉक्टर  यांना तात्काळ निलंबित करण्यात आले आहे.

दरम्यान शोकाकुल कुटुंबाने केलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी तीन सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. रविवारी (२८ जुलै) रात्री एका वाहनाने ३० वर्षीय सुनील कुमार यांच्या दुचाकीला कारने धडक मारली होती. सुनील यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. ड्युटीवर असलेल्या डॉक्टर झोपले होते. त्यांना जागे होण्यासाठी आम्ही बरीच वाट पाहिली. इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांना मदतीसाठी विनंती केली. रक्तस्त्राव होत असल्याने सुनील यांचा स्ट्रेचरवरच मृत्यू झाला, असे सुनील कुमार यांच्या नातेवाईकांनी म्हटले आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group