भीषण अपघात : कार थेट मंदिरात घुसली ; अन् 'इतक्या' जणांना चिरडलं , दोघांचा मृत्यू, कुठे घडली घटना?
भीषण अपघात : कार थेट मंदिरात घुसली ; अन् 'इतक्या' जणांना चिरडलं , दोघांचा मृत्यू, कुठे घडली घटना?
img
Dipali Ghadwaje
छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघाताची घटना उघडकीस आली आहे. शहरातील सिडको भागात असलेल्या काळा गणपती मंदिरासमोर एक भीषण अपघात घडला. मंदिरासमोर दर्शनासाठी आलेल्या भाविकांना सुसाट कारने उडवले. जवळपास ५ ते ६ जणांना चिरडल्याची माहिती आहे. जखमींना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.

छत्रपती संभाजीनगरमधील सिडको भागांत असलेल्या काळा गणपती मंदिरासमोर एक भयानक अपघात घडला. काही भाविक मंदिराच्या पायऱ्या चढून मंदिराच्या दिशेनं जात होते. मात्र, एका कारचा नियंत्रण सुटला आणि भरधाव कार थेट मंदिराच्या पायऱ्यांवर चढली. या भीषण अपघातात जवळपास ५ ते ६ जणांना चिरडले गेल्याची माहिती आहे.

त्यापैकी दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. चार जण गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. मंदिराच्या पायऱ्याजवळ रक्ताचे थारोळे साचल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

या भीषण अपघाताच्या घटनेनंतर कारचालक फरार झाला. पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून, पोलीस फरार कारचालकाचा शोध घेत आहेत. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group