लष्करी वाहनाचा भीषण अपघात ! 10 जवानांचा मृत्यू
लष्करी वाहनाचा भीषण अपघात ! 10 जवानांचा मृत्यू
img
वैष्णवी सांगळे
जम्मू आणि काश्मीरच्या दोडा जिल्ह्यात १७ सैनिक असलेले लष्कराचे एक वाहन २०० फूट खोल दरीत कोसळून भीषण अपघात झाला आहे. ही दुर्घटना भादेरवाह येथील खानी टॉप परिसरात घडली. लष्करी अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, या अपघातात 10 सैनिक शहीद झालेत. 

तर जखमी सैनिकांना घटनास्थळी तातडीने प्राथमिक उपचार देण्यात आले. नंतर त्यांना उपचारांसाठी विमानाने उधमपूर येथे नेण्यात आले. एका लष्करी अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, दरीत कोसळलेले वाहन बुलेटप्रूफ होते. त्यात एकूण १७ सैनिक होते. ते एका उंच चौकीकडे जात असताना चालकाचे नियंत्रण सुटले आणि वाहन २०० फूट खोल दरीत कोसळले. 

जखमींपैकी किमान तीन जवानांची प्रकृती गंभीर असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.त्यांना उपचारासाठी उधमपूर लष्करी रुग्णालयात नेण्यात आले. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. लष्कर आणि स्थानिक प्रशासनाकडून घटनेचा तपास सुरू असून, रस्त्याची अवस्था आणि हवामान यासह सर्व बाबींची चौकशी केली जात आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group