भीषण अपघात !  श्रावण सोमवारी भाविकांवर काळाचा घाला,  सात महिलांचा मृत्यू
भीषण अपघात ! श्रावण सोमवारी भाविकांवर काळाचा घाला, सात महिलांचा मृत्यू
img
वैष्णवी सांगळे
 पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील कुंडेश्वर दर्शनाला जाताना भीषण अपघात झाला असून या दुर्दैवी घटनेत 7 महिला भाविकांचा मृत्यू झाला आहे. नागमोडी वळणावर घाट चढताना गाडी रिटर्न आल्याने महिला भाविकांची पिकअप जीप पलटली. विशेष म्हणजे या पिकअपने 5 ते 6 पलटी खाल्ल्यानंतर ती रस्त्याच्या कडेला खाली कोसळली होती. अपघातात ७ महिला भाविकांचा मृत्यू तर 15 ते 20 महिला भाविक जखमी झाल्या आहेत. साधारणत: दुपारी सव्वा एक वाजताच्या सुमारासचा हा अपघात घडल्याची माहिती आहे. 

टॅरिफ वॉर : आता बस्स... भारताकडून अमेरिकेला जशास तसं उत्तर मिळणार !

अपघाताची माहिती मिळताच खेड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने पोलिसांनी जखमी झालेल्या महिला भाविकांना रुग्णालयात दाखल केले. जखमी भाविकांना खासगी रुग्णालय आणि चांडोली ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जखमींमधील अनेकांची प्रकृती गंभीर आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. या अपघातामुळे खळबळ उडाली आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group