अभिनेता अक्षय कुमारच्या ताफ्यातील कारचा भीषण अपघात !  रिक्षा चालकाची प्रकृती गंभीर
अभिनेता अक्षय कुमारच्या ताफ्यातील कारचा भीषण अपघात ! रिक्षा चालकाची प्रकृती गंभीर
img
वैष्णवी सांगळे
मुंबईतील जुहू परिसरात सोमवारी रात्री एक भीषण अपघात झाला. एका भरधाव मर्सिडीज कारने रिक्षाला जोराची धडक दिली, ज्यामुळे ही रिक्षा बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारच्या ताफ्यातील सुरक्षा वाहनावर (पायलट कार) जाऊन आदळली. या घटनेत रिक्षाचालक गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अक्षय कुमार पत्नी ट्विंकल खन्नासोबत विमानतळावरून जुहू येथील बंगल्याकडे निघाला होता. यादरम्यान अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना एकाच गाडीत होते. त्यांच्या गाडीच्या मागे त्यांच्या सुरक्षारक्षकांची कार होती. यादरम्यान एक मर्सिडीज कारचे नियंत्रण पूर्णपणे सुटले आणि त्या मर्सिडीजने अगोदर ऑटोला धडक दिली. त्यानंतर ही कार अक्षय कुमार याच्या सुरक्षारक्षकांच्या कारला येऊन धडकली. पुढे अक्षय कुमार असलेल्या कारलाही थोडी धडक बसल्याची माहिती मिळतेय. मात्र, ज्यावेळी अक्षय कुमार याच्या सुरक्षारक्षकांच्या कारला मर्सिडीजने धडक दिली त्यावेळी ती थेट पलटी झाली.

या अपघातात ऑटो रिक्षामधील दोन प्रवासी जखमी झाले आहेत. त्यात ऑटो चालकाचाही समावेश आहे. रिक्षाचालक गंभीर जखमी झाला. जखमींना तत्काळ जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्राथमिक तपासात अपघात नेमका कशामुळे झाला, हे स्पष्ट झालेले नाही. मात्र, वाहनांच्या वेगामुळे आणि अचानक ब्रेक लागल्याने हा अपघात घडल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू असून सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवले जात आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group