कोर्टाकडून दिलासा ! 'जॉली एलएलबी ३' चित्रपटाविरोधातील 'ती' याचिका फेटाळली; नेमकं प्रकरण काय?
कोर्टाकडून दिलासा ! 'जॉली एलएलबी ३' चित्रपटाविरोधातील 'ती' याचिका फेटाळली; नेमकं प्रकरण काय?
img
वैष्णवी सांगळे
प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात यशस्वी झालेला जॉली एलएलबी आता पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. 'जॉली एलएलबी' चे दोन भाग यापूर्वी प्रदर्शित झालेले आहे, आता लवकरच म्हणजेच १९ सप्टेंबरला चित्रपटाचा तिसरा भाग प्रदर्शित होणार आहे. चित्रपट चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली असताना  चित्रपटाचा टीझरमुळे वाद निर्माण झाला होता.

दिवाळीपूर्वी देशवासियांना मोठं गिफ्ट ! शेतकरी, महिला ते सर्वसामान्यांना मिळणार मोठा दिलासा

'जॉली एलएलबी ३' विरोधात अलाहाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली होती. चित्रपटात वकील आणि न्यायाधीशांना चुकीच्या पद्धतीने सादर करण्यात आले असल्यामुळे निर्मात्यांविरुद्ध याचिका देखील दाखल करण्यात आली होती, जी आता फेटाळण्यात आली आहे. 

धक्कादायक ! धार्मिक कार्यक्रमात जेवणातून संपूर्ण गावाला विषबाधा

उच्च न्यायालयाच्या म्हणण्यानुसार, त्यांना चित्रपटात न्यायव्यवस्थेच्या प्रतिमेला हानी पोहोचवू शकेल असे काहीही आढळले नाही. न्यायमूर्ती संगीता चंद्रा आणि न्यायमूर्ती ब्रिज राज सिंह यांच्या खंडपीठाने चित्रपटाचे तिन्ही ट्रेलर, टीझर आणि गाणी पाहिल्यानंतर चित्रपटाच्या निर्मात्यांच्या बाजूने निकाल दिला. अलाहाबाद उच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटले आहे की, 'आम्ही 'भाई वकील है' या गाण्याचे बोल देखील वाचले आहेत आणि आम्हाला असे काहीही आढळले नाही जे प्रत्यक्षात वकिलांच्या कायदेशीर व्यवसायात समस्या निर्माण करेल.
इतर बातम्या
Join Whatsapp Group