‘त्या’ प्रकरणात शाहरुख खान, अक्षय कुमार, अजय देवगणला अलाहाबाद हायकोर्टाने पाठवली नोटीस
‘त्या’ प्रकरणात शाहरुख खान, अक्षय कुमार, अजय देवगणला अलाहाबाद हायकोर्टाने पाठवली नोटीस
img
Dipali Ghadwaje
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान, अक्षय कुमार आणि अजय देवगनला पान मसाल्याची जाहिरात करणे महागात पडले आहे. पुन्हा एकदा पान मसाल्याची जाहिरात हे प्रकरण चर्चेत आले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार या तिघांना अलाहाबाद न्यायालयाने नोटीस पाठवली आहे.

काही दिवसापूर्वी हे तिन्ही कलाकार एका गुटख्याच्या जाहिरातीत एकत्र दिसले होते. यावरून अलाहाबाद न्यायालयाने तिन्ही कलाकारांवर कारवाई करत नोटीस पाठवली आहे.

अवमान याचिकेवर उत्तर देताना केंद्र सरकारने अलाहाबाद न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाला कळवले आहे की, गुटखा कंपन्यांच्या जाहिरातींबाबत अभिनेता अक्षय कुमार, शाहरुख खान आणि अजय देवगण यांना नोटीस बजावली आहे.

तर  केंद्राच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयातही याच मुद्द्यावर सुनावणी सुरू आहे. यामुळे ही याचिका तातडीने फेटाळण्यात यावी अशी माहिती उच्च न्यायालयाला दिली. हा युक्तिवाद ऐकल्यानंतर उच्च न्यायालयाने 9 मे 2024 रोजी  या प्रकरणाची पुढील सुनावणी निश्चित केली आहे.


तिन्ही कलाकारांचे प्रकरण गुटखा कंपन्यांशी संबंधित आहे

न्यायमूर्ती राजेश सिंह चौहान यांच्या खंडपीठाने यापूर्वी केंद्र सरकारला याचिकाकर्त्याच्या प्रतिनिधीत्वावर निर्णय घेण्याचे आदेश दिले होते, ज्यांनी मुळात अभिनेते आणि प्रतिष्ठित व्यक्तींवर कारवाई केली पाहिजे असा युक्तिवाद केला होता, परंतु ते गुटखा कंपन्यांच्या जाहिराती करत आहेत.
 
तर याचिकाकर्त्याने युक्तिवाद करताना सांगितले की, सरकारला 22 ऑक्‍टोबरला निवेदन देण्यात आले होते, मात्र त्यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही. यामुळे उच्च न्यायालयाने या याचिकेवर केंद्र सरकारच्या कॅबिनेट सचिवांना नोटीस बजावली होती. उच्च न्यायालयात डेप्युटी सॉलिसिटर जनरल एसबी पांडे यांनी सांगितले की अक्षय कुमार, शाहरुख खान आणि अजय देवगण यांना केंद्राने नोटीस बजावली आहे.

 
 

इतर बातम्या
Join Whatsapp Group