शाहरुख खान सोबत IPL चा सामना का पाहत नाही, 'ही' अभिनेत्री? स्वत:च केला खुलासा
शाहरुख खान सोबत IPL चा सामना का पाहत नाही, 'ही' अभिनेत्री? स्वत:च केला खुलासा
img
Dipali Ghadwaje
बॉलिवूडचा 'किंग खान' अर्थात शाहरुख खान, जूही चावला आणि तिचा पती जय मेहता हे सध्या आयपीएलमुळे चर्चेत आहेत. हे तिघेही आयपीएलमधील क्रिकेट टीम कोलकाता नाईट रायडर्सचे मालक आहेत. जेव्हा केकेआरचा सामना असतो तेव्हा शाहरुख खान आपल्या टीमला सपोर्ट करण्यासाठी स्टेडिअमवर पोहोचतो.

अनेकवेळा जुही चावला आणि जय मेहता हे देखील शाहरुख खानसोबत स्टँडमध्ये टीमला सपोर्ट करताना दिसतात. पण जुही चावलाला शाहरुख खानसोबत आयपीएल पाहणे अजिबात आवडत नाही. अभिनेत्रीने नुकताच एका मुलाखतीमध्ये याचा खुलासा केला आहे.

नुकताच एका कार्यक्रमादरम्यान जुही चावलाने शाहरुख खानसोबत आयपीएलचा सामना पाहणे खूप अवघड असल्याचे सांगितले. कारण जेव्हा जेव्हा टीम चांगली कामगिरी करत नाही तेव्हा तो आपला सगळा राग त्यांच्यावर काढतो, असे जुही चावलाचे म्हणणे आहे. त्यामुळे आयपीएलचा सामना शाहरुख खानसोबत पाहणे ही खूपच वाइट आयडिया असल्याचे सांगितले. त्याचसोबत तिने यावेळी शाहरुख खानसोबत ती सामना का नाही पाहत यामागचे सत्य सांगितले आहे.

एका वृत्त संस्थेच्या वृत्तानुसार, जुही चावलाने एका कार्यक्रमादरम्यान सांगितले की, शाहरुख खानसोबत केकेआरचा सामना पाहणे अजिबात योग्य नाही. ती म्हणाली की, 'त्याच्यासोबत मॅच पाहणे कठीण होते कारण जेव्हा आमची टीम चांगली कामगिरी करत नाही तेव्हा तो त्याचा सर्व राग माझ्यावर काढतो. मग मी त्याला सांगतो की, हे सर्व मला नाही तर संघाला सांग. 

त्यामुळे आम्ही सामना पाहण्यासाठी परिपूर्ण नाही. मला वाटते की इतर संघ मालकांसोबतही असेच होत असल. जेव्हा त्यांची टीम खेळत असेल तेव्हा ते देखील घामाने भिजत असतील.'

जुही चावलाने पुढे सांगितले की, जेव्हा आमची टीम खेळते तेव्हा त्यांना पाहणे खूपच मनोरंजक असते आणि आम्ही सर्वजण खूप तणावात असतो. आयपीएल नेहमीच रोमांचक असते. आम्ही सर्वजण टीव्हीसमोर बसून राहतो.' खरं तर शाहरुख खान आणि जुही चावला अनेक चित्रपटांमध्ये स्क्रीन शेअर करण्यासोबतच चांगले फ्रेंड्स देखील आहेत. या मैत्रीमुळेच शाहरुख खान आणि जुही चावला यांनी कोलकाता नाईट रायडर्स टीम एकत्र खरेदी केली होती. कोलकाता नाइट रायडर्स ही आयपीएलच्या पहिल्या एडिशनपासून म्हणजेच २००८ पासून आहे. शाहरुख खान आणि जुही चावला यांच्या टीमने आतापर्यंत दोनदा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group