फिल्मी करिअरला रामराम करत पूर्णवेळ राजकारणात होणार सक्रिय होण्याचा तामिळ सिने जगताचा दिग्गज अभिनेता थलापथी विजय यांनी निर्णय घेतला आहे. ३३ वर्षांच्या दीर्घ आणि यशस्वी करिअर नंतर चित्रपटसृष्टीला निरोप देण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यांच्या आगामी चित्रपट ‘जाना नायकन’ च्या ऑडिओ लाँच कार्यक्रमात हा निर्णय जाहीर केला आणि पुढे राजकारणात पूर्णपणे सक्रिय होण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
थलपती विजयचा अखेरचा सिनेमा 'जाना नायकन' ९ जानेवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. आपल्या लाडक्या सुपरस्टारनं इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतल्यामुळे चाहते भावूक झाले आहेत. अलिकडेच, सिनेमाच्या ऑडिओ लाँच कार्यक्रमात, विजय थलपती काहीसा भावूक होताना दिसला, त्याच्या डोळ्यात अश्रुही तराळले होते. सिनेमानंतर, विजय आता पूर्णपणे राजकारणावर लक्ष केंद्रीत करेल.
२७ डिसेंबर २०२५ रोजी मलेशियात आयोजित ‘थलपथी थिरुविझा’ या विशेष इवेंटमध्ये विजयने भावनिक भाषणात सांगितले की त्यांचा अभिनय कारकिर्दीचा शेवटचा टप्पा ‘जाना नायकन’ असेल आणि यानंतर ते राजकारणात पूर्ण वेळ काम करतील. ते म्हणाले, “फॅन्सने मला जे काही दिले त्यासाठी मी सिनेमाला अलविदा म्हणतो आणि त्यांच्या सेवेसाठी राजकारणात प्रवेश करतो.”
विजयने त्यांच्या भाषणात सांगितले की त्यांनी ‘सिनेमात प्रवेश केल्यावर मी फक्त एक लहान वाळूचं घर उभं केलं’ आणि प्रेक्षकांनी त्याला महाल बनवला’ असे सांगत त्यांच्या चाहत्यांचे आभार मानले. त्यांनी स्पष्ट केले की आता ते लोकसेवा आणि समाजाच्या हितासाठी राजकीय कार्यात जीवन समर्पित करणार आहेत.