धक्कादायक : ११ दिवसांपासून गायब असलेल्या शिंदे गटाच्या नेत्याचा अपहरणानंतर खून?
धक्कादायक : ११ दिवसांपासून गायब असलेल्या शिंदे गटाच्या नेत्याचा अपहरणानंतर खून? "ही" माहिती आली समोर
img
DB
पालघर : शिंदे गटाचे पदाधिकारी आणि डहाणू विधानसभा मतदारसंघाचे समन्वयक अशोक धोडी हे मागील अकरा दिवसांपासून बेपत्ता आहेत. एक राजकीय पदाधिकारी बेपत्ता होऊन इतके दिवस उलटले, तरी पोलिसांना अद्याप धोडी यांचा शोध घेण्यात यश आलं नाही.

मिळालेल्या माहितीनुसार , पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या आधारे धोडी यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र अजूनही पोलिसांना धोडी यांच्याबद्दल फारशी माहिती मिळाली नाही.

अपहरणाच्या घटनेला 11 दिवस उलटून गेल्याने आणि धोडी यांचा काहीच थांगपत्ता लागत नसल्याने धोडी यांच्यासोबत घातपात घडला असावा, असा संशय आता पोलिसांकडून व्यक्त केला जातोय.

20 जानेवारी रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास धोडी यांचं अपहरण करण्यात आलं होतं. यानंतर त्यांची गाडी गुजरातच्या दिशेनं गेल्याचं एका सीसीटीव्ही दिसून आलं होतं. पण त्यानंतर पोलिसांना धोडी यांच्या गाडीचा माग घेता आलेला नाहीये.

 मिळालेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी 20 जानेवारीला अशोक धोडी यांनी आपल्या पत्नीला फोन केला होता. आपण डहाणूवरून घरी येत असल्याचं त्यांनी पत्नीला सांगितलं होतं. मात्र त्यानंतर त्यांचा फोन बंद झाला.

आता अकरा दिवसानंतरही त्यांचा काहीच थांगपत्ता लागत नाहीये. पाच आरोपींनी धोडी यांचं अपहरण केल्याचा संशय पोलिसांना आहे. हे पाचही आरोपी फरार असून यातील दोन आरोपी हे राजस्थानला पळून गेल्याची माहिती समोर येत आहे.
 
शिवाय पोलीस चौकीतून पळून गेलेला आरोपी अजूनही पोलिसांच्या हाती लागला नाही. अशोक धोडी हे परराज्यातून होणाऱ्या दारू तस्करीत अडचण ठरत होते. याच कारणातून त्यांचं अपहरण करून त्यांच्यासोबत घातपात केल्याचा संशय पोलिसांना आहे. दारू तस्करीतून संशयित आरोपींनी कोट्यावधींची माया जमवल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group