एकनाथ शिंदेंना धक्का ! पक्षातील बडा नेता म्हणतो, माझी हकालपट्टी करा... कारण
एकनाथ शिंदेंना धक्का ! पक्षातील बडा नेता म्हणतो, माझी हकालपट्टी करा... कारण
img
वैष्णवी सांगळे
महापालिका निवडणूक अबघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. उमेदवारी मिळावी यासाठी कार्यकर्त्यांकडून , नेत्यांकडून मोठे प्रयत्न केले जात आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का बसला आहे. कल्याण-डोंबिवलीत भाजप आणि शिवसेना शिंदे गटाची युती झाल्यानं भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर आहे, तर दुसरीकडं शिंदे गटामध्ये प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. त्यामुळे राजीनामा सत्र सुरू आहे. 

कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणूक अत्यंत चुरशीची आणि प्रतिष्ठेची होईल, असा कयास लावला जात आहे. माजी नगरसेवक आणि माजी सभागृह नेता कैलास लखा शिंदे आणि कल्याण ग्रामीणतील मनोज गणपत चौधरी यांनी उपशहर प्रमुखपदाचा राजीनामा दिला आहे. विशेष म्हणजे कैलास लखा शिंदे यांनी थेट माझी शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. आज राजकारणात निष्ठा नाही, आर्थिक क्षमता हाच निकष आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. महापालिका निवडणुकीत तिकीट न मिळाल्याने पक्षासाठी माझा त्याग, असे पत्रात नमूद केले आहे.

आनंद दिघे आणि एकनाथ शिंदे यांना कट्टर कार्यकर्ता म्हणून सर्वगुण असताना राजकारणात निवडणुकीसाठी लागणारा 'आर्थिक सक्षम' हा गुण माझ्याकडे नाही. त्यामुळे मी कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत उमेदवारी मिळवण्यास पात्र नाही. माझ्यामुळं पक्षाचे नुकसान होऊ नये यासाठी माझी पक्षातून हकालपट्टी करण्यात यावी, असेही त्यांनी पत्रात म्हटले आहे.

दुसरीकडे, कल्याण ग्रामीणतील मनोज गणपत चौधरी यांनी उपशहर प्रमुखपदाचा राजीनामा दिला आहे. वैयक्तिक कारणामुळं किंवा सध्याच्या राजकीय परिस्थितीचा विचार करून मी या पदावर काम करण्यास असमर्थ असून, मी पदाचा त्याग करत आहे. माझा राजीनामा स्वीकारण्यात यावा, अशी विनंती चौधरी यांनी केली आहे.


इतर बातम्या
Join Whatsapp Group