नाशिक (प्रतिनिधी) – हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने तसेच शिवसेना मुख्य नेते, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खा. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी यांच्या आदेशानुसार विक्रम नागरे यांची शिव कर्मचारी सेना संघटनेच्या प्रदेश सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
यावेळी खा. श्रीकांत शिंदे यांनी विक्रम नागरे यांना त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या नियुक्तीच्या प्रसंगी शिवसेना उपनेते व नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख विजय करंजकर, सह संपर्क प्रमुख राजु लवटे, आणि महानगरप्रमुख प्रविण तिदमे उपस्थित होते.