मु्ंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील विडंबन पद्धतीने गाणं गायल्यामुळे प्रसिद्ध कॉमेडियन कुणाल कामरा अडचणीत सापडला आहे.
एकीकडे पोलिसांनी त्याला हजर राहण्याचं समन्स बजावलं आहे. तर दुसरीकडे, शिवसैनिकांचे त्याला धमक्यांचे फोन येत आहे. आता महाराष्ट्र सरकारमधील मंत्री तथा शिवसेना नेते शंभूराज देसाई यांनी कुणाल कामरा याला इशारा दिला आहे.
शंभूराज देसाई म्हणाले की, कुणाल कामरा कोणत्या बिळात लपलेला आहे आणि त्याला कुठे भेटायचं ते फक्त सांगा. उपमुख्यमंत्री शिंदे यांनीच सगळ्यांना थांबण्यास सांगितलं आहे, अन्यथा शिवसैनिक त्याला रस्त्यावर आणतील आणि धडा शिकवतील.
शंभूराज देसाई पुढे म्हणाले की, कुणाल कामराने मर्यादांचं उल्लंघन केलंय. पाणी आता डोक्यावरुन गेलंय, आता त्याला धडा शिकवण्याची वेळ आलीय. तो ज्या बिळात लपून बसलेला असेल त्याला तिथून काढून रस्त्यावर आणू, आणि त्याला थर्ड डिग्री देण्याची गरज आहे, असं देसाई यांनी म्हटलं आहे.