विश्वविजेत्या रोहित, सूर्या, दुबे अन् यशस्वीचा एकनाथ शिंदेंकडून सत्कार, पाहा व्हिडीओ
विश्वविजेत्या रोहित, सूर्या, दुबे अन् यशस्वीचा एकनाथ शिंदेंकडून सत्कार, पाहा व्हिडीओ
img
DB
विश्वविजेता रोहित शर्मा, शिवम दुबे, सूर्यकुमार यादव आणि यशस्वी जैयस्वाल यांचा सत्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. आज वर्षा निवसस्थानी रोहित शर्मा आणि इतर खेळाडू आले होते. त्यावेळी शाल आणि श्रीफळ देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचा सन्मान केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोशल मीडियाद्वारे या प्रसंगाचे लाईव्ह प्रेक्षपण केले. आज दुपारी रोहित शर्मा महाराष्ट्रातील खेळाडूंसोबत आज वर्षा निवस्थानवर पोहचला होता.  त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी त्यांचं स्वागत केले. 

दरम्यान दोघांमध्ये मराठीमधून गप्पाही झाल्या. विश्वचषकातील प्रसांगावर दीर्घ चर्चा झाली. पारस भांब्रेही यावेळी त्यांच्यासोबत होते. एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानावर झालेल्या या कार्यक्रमात प्रताप सरनाईकही उपस्थित होते. 



टीम इंडियाचा 125 कोटी रुपये देऊन गौरव
वानखेडे स्टेडिअमवर टीम इंडियाच्या सत्काराचा कार्यक्रम झाला. जय शाह यांनी या ठिकाणी टीम इंडियाचा 125 कोटी रुपये देऊन गौरव केला. या कार्यक्रमासाठी बीसीसीआयचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.    

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group