पुण्यातील सुप्रसिद्ध विधिज्ञ अॅडव्होकेट असीम सरोदे यांची वकिलीची सनद तीन महिन्यांसाठी रद्द करण्यात आली आहे. महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलने सोमवारी हा निर्णय घेतला. अॅडव्होकेट विवेकानंद घाटगे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने हे निर्देश दिलेले आहेत. असीम सरोदे यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमात राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्षांविरोधात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे ही कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे.
वृत्तानुसार, सरोदे यांनी आपल्या भाषणात 'फालतू' असा शब्द वापरल्याने त्यांच्यावर ही कारवाई झाली. या वक्तव्यांच्या विरोधात न्यायालयात दाद मागण्यात आली होती, ज्यानंतर बार कौन्सिलने त्यांच्यावर तीन महिन्यांसाठी वकिली करण्यावर बंदी घातली आहे. या कारवाईमुळे सरोदे यांना मोठा धक्का बसला असून,
त्यामुळे असीम सरोदे यांच्यावर ही कारवाई करण्यात आली.
असीम सरोदेंनी एका जाहीर कार्यक्रमात न्यायव्यवस्थेविषयी टिप्पणी केली होती. त्यांनी म्हटले होते की, न्यायव्यवस्था सरकारच्या दबावाखाली आहे आणि निकाल सरकारच्या बाजूने दिले जातात. तसेच राज्यपाल हा फालतू आहे असे वक्तव्य केल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
असीम सरोदे हे सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरु असलेल्या सुनावणीत सहभागी असणाऱ्या वकिलांपैकी एक आहेत. मात्र, आता त्यांची सनद रद्द झाल्याने त्यांना न्यायालयात यु्क्तिवाद करता येणार नाही. याबाबत अॅडव्होकेट असीम सरोदे यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.