
२८ जुलै २०२५
नागपुरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नागपुरमधील एका बियर बारमध्ये शासकीय फाईल घेऊन ३ व्यक्ती बसून असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार ,मनीष नगर येथील एका बिअर बारमध्ये दुपारच्या सुमारासचा हा व्हिडिओ असल्याचे सांगितले जात आहे. त्यातील एक व्यक्ती दारूचे घोट घेत शासकीय फायली दाखवताना या व्हिडीओमध्ये दिसत आहे.
सध्या या व्हिडीओची जोरदार चर्चा होत आहे. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, फाइलच्या वर मोठ्या अक्षरात 'महाराष्ट्र शासन' असे लिहिल्याचे दिसत आहे.
दरम्यान आता बारमध्ये शासकीय फाईल घेऊन येणारे 'हे' अधिकारी कोण होते?, 'ते' कोणत्या विभागाचे होते? आणि 'त्यांनी' कोणत्या महत्त्वाच्या फाइल्स का आणल्या?, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
बारमध्ये शासकीय फाईली घेऊन दारूचा घोट घेत असल्यानं या फाईल, तेही रविवारी सुट्टीच्या दिवशी कार्यालयाबाहेर आल्याच कशा आणि तेही चक्क बारमध्ये असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. याबारमध्ये असलेल्या सीसीटीव्हीच्या माध्यमातून हा सगळा प्रकार सामोरं आणून कारवाईची मागणी केली जात आहे.
Copyright ©2025 Bhramar