नागपुरात सध्या राज्याचं हिवाळी अधिवेशन सुरु आहे. आज या हिवाळी अधिवेशनाचा पाचवा दिवस आहे. विधान परिषदेचं कामकाज सुरु असताना भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांना शॉक लागला.
विधान परिषदेत बोलण्यासाठी त्यांच्या बाकावर उभे राहताच दोन-तीनवेळा शॉक लागल्याचं प्रसाद लाड यांनी सभागृहात सांगितलं. मला काही झालं तर राज्याचे नुकसान होईल, असा मिश्कील टोलाही प्रसाद लाड यांनी शॉक लागताच सभागृहात बोलावून दाखवला.
नेमकं काय घडलं ?
प्रसाद लाड - मला इकडे शॉक बसतोय , मला काही झालं तर राज्याचे नुकसान होईल
प्रविण दरेकर (खाली बसून) - तुम्हाला काही झालं तर पुतळा उभारू
अनिल परब - शॉक प्रकरणाची एसआयटी चौकशी करा
त्यांची आत्ताच एक चौकशी झाली आहे : प्रविण दरेकरांच्या विधानाने सभागृहात हशा
सभापती राम शिंदे - तुम्ही सभागृहाचे लाड आहात.. तुम्हाला काही होऊ देणार नाही.. काळजी घेतली जाईल