दैनिक भ्रमर : नागपूरमध्ये एका भोंदूबाबाचे मोठे कांड समोर आले आहे. कुटूंबावरील संकटे दूर कऱण्यासाठी एका महिलेला नग्न पूजा करायला लावली, यात पुजेचा व्हिडिओ तिला पाठवून ब्लॅकमेलिंग करत अश्लील कृत्य केले, हा प्रकार अनेक दिवसांपासून सुरु होता. अखेर भोंदूबाबाच्या त्रासाला कंटाळून पीडित महिलेने पोलिसांत धाव घेतली. नागपूरच्या पाचपावली पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार हबीबुल्ला मलिक उर्फ मामा असे आरोपी भोंदूबाबाचे नाव आहे असून तो मूळचा पश्चिम बंगाल येथील आहे.. मात्र मागील वीस वर्षापासून नागपुरात स्थायीक झाला आहे. त्यावर नागपूरच्या पाचपावली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या भोंदूने कुटुंबावरील संकट दूर करण्यासाठी महिलेसोबत ओळख वाढवून घरात प्रवेश मिळवला. आणि मी काळी जादू जाणतो म्हणुन महिलेला नग्न पूजा करण्यास भाग पाडले. यानंतर पुजेचा व्हिडिओ बनवला.
हा व्हिडिओ दाखवून भोंदूबाबा गेल्या अनेक दिवसांपासून सदर महिलेसोबत अश्लील कृत्य करत होता, तसेच महिलेला कुटुंबीयाला जीवे मारण्याची धमकी देत होता. मात्र महिलेने हिंमत दाखवत पोलिसात तक्रार दिली. त्यानंतर गुन्हा दाखल करत भोंदूबाबाला अटक करण्यात आली आहे.
सदरील भोंदूबाबा त्याच्या भागात मामा म्हणून प्रसिद्ध आहे. त्याच्या टार्गेटवर कष्टकरी आणि गरीब लोक असायचे. तो नेहमी साधारण चहा टपरीवर थांबायचा आणि तेथे लोक घरातील समस्या बोलत असताना. मी काळी जादू करतो म्हणून त्यांना हेरायचा. या भोंदूने अशाच प्रकार अनेक महिलांसोबत गैरकृत्य केल्याचा संशय आहे, पोलिस पुढील तपास करत आहेत.