CM फडणवीसांसोबतच्या भेटीचं नेमकं कारण काय? राज ठाकरे म्हणाले...
CM फडणवीसांसोबतच्या भेटीचं नेमकं कारण काय? राज ठाकरे म्हणाले...
img
वैष्णवी सांगळे
दैनिक भ्रमर : बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंचा दारुण पराभव झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मनसेप्रमुख राज ठाकरे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला गेल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. राज ठाकरे हे गुरुवारी सकाळी अचानक वर्षा बंगल्यावर देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला पोहोचले. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. या भेटीचे विविध राजकीय अर्थ काढले जात होते. मात्र या भेटीत राजकीय नाहीतर मुंबईतील वाहतूक कोंडी, पार्किंग समस्या आणि शहराच्या सुनियोजित विकासावर चर्चा झाल्याचे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले. 

राज ठाकरे यांनी सांगितलं की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना शहरातील पायाभूत समस्यांवर एक प्रेझेंटेशन दिले. त्यांनी मागील काही महिन्यांपासून शहरातील वाहतूक आणि पार्किंगच्या प्रश्नांवर एक आराखडा तयार केला होता. हा आराखडा कसा असेल, याबाबत मुख्यमंत्री आणि संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली. 

नाशिककरांसाठी आनंदची बातमी ! मुंबई-नाशिक प्रवास होणार सुसाट, कारण...

राज ठाकरे पुढे म्हणाले की, “आपण कबूतर, हत्ती यांसारख्या विषयांमध्ये अडकल्यामुळे मूलभूत समस्यांकडे दुर्लक्ष होत आहे. मात्र सध्या आपल्या शहरांत पार्किंगला शिस्त लावण्याची तातडीची गरज आहे. डबल पार्किंग आणि 'नो पार्किंग'चा विषय वाढत आहे. यावर तोडगा म्हणून त्यांनी ‘स्मार्ट पार्किंग'चा उपाय राज ठाकरे यांनी सुचवला. 

राज्यातील शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे वाढत आहेत. जिथे ५० लोक राहत होते, तिथे ५०० लोक राहत आहेत. त्यामुळे माणसे आणि वाहने वाढली असून, सगळ्या गोष्टी रस्त्यावर आल्या आहेत. रस्ते कमी आहेत, वाहतुकीला शिस्त नाही आणि लोक कुठेही गाड्या पार्क करत आहेत. यावर आताच काम केले नाही, तर भविष्यात मोठी अडचण होईल, अशी भीती देखील राज ठाकरे यांनी व्यक्त केली.
इतर बातम्या
Join Whatsapp Group