नाशिककरांसाठी आनंदची बातमी ! मुंबई-नाशिक प्रवास होणार सुसाट, कारण...
नाशिककरांसाठी आनंदची बातमी ! मुंबई-नाशिक प्रवास होणार सुसाट, कारण...
img
वैष्णवी सांगळे
दैनिक भ्रमर : मुंबई आणि नाशिक आता प्रवास सुसाट होणार आहे. मध्य रेल्वे प्रशासनाने यासाठी पाऊस उचलले आहे. लवकरच मुंबई ते नाशिकदरम्यान मेमू शटल सेवा सुरु होणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या सेवेसाठी प्रयत्न सुरु होते. त्यांना आता यश येताना दिसत आहे. यामुळे मुंबई ते नाशिक प्रवास करणाऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

कसारा घाटात मेमू लोकलची चाचणी घेण्यास सुरुवात केली आहे. हा घाट आव्हानात्मक आहे. त्यामुळे या मार्गावर टेस्ट घेतली जात आहे.या सेवेमुळे मुंबई नाशिककरांना खूप फायदा होणार आहे. ही सेवा सुरु झाल्यानंतर प्रवाशांना मेल किंवा एक्सप्रेसवर अवलंबून राहावे लागणार नाही. त्यासोबतच प्रवाशांना आरामदायी प्रवास करता येणार आहे. 

राज्याच्या राजकारणात खळबळ ! राज ठाकरेंनी घेतली फडणवीसांची भेट

गेल्या काही वर्षांपासून ही लोकल सेवा सुरु करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, परंतु तांत्रिक कारणामुळे हा प्रकल्प यशस्वी होऊ शकला नाही. आता प्रशासनाने शटल सेवा सुरु करण्यासाठी चाचणी घेण्यास सुरुवात केली आहे. या चाचणीत कसारा घाटातील चढ-उतार मार्गावर मेमू लोकलची क्षमता तपासली केली जाणार आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group