नाशिक : जादूटोणा करून कुटुंबासह सराफ व्यावसायिकाला त्रास देणार्‍याला अटक
नाशिक : जादूटोणा करून कुटुंबासह सराफ व्यावसायिकाला त्रास देणार्‍याला अटक
img
वैष्णवी सांगळे
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) - वेगवेगळ्या प्रकारे जादूटोणा करून कुटुंबीयांना त्रास देण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार कलानगर परिसरात घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, की नोव्हेंबर 2025 ते दि. 29 जानेवारी 2026 या कालावधीत संशयित आकाश दिनकर साळवे (वय 28, रा. प्लॉट नंबर 2, लता निवास, जय मल्हारनगर, मखमलाबाद, नाशिक) याने फिर्यादी श्यामराव छगनराव बिरारी (वय 57, रा. कलानगर, म्हसरूळ) व त्यांच्या कुटुंबीयांना त्रास देण्याच्या उद्देशाने वेळोवेळी जादूटोणा केला.

जाधव हा बिरारी यांना नुकसान पोहोचविण्याच्या दृष्टीने मंतरलेले तांदूळ, सुपार्‍या, तेजपत्ते व टाचण्या टोचलेले लिंबू बिरारी यांच्या घरासमोर व दुकानासमोर टाकत होता. या त्रासाला कंटाळून बिरारी यांनी आकाश साळवेविरुद्ध म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आकाश साळवे याला अटक केली असून,  पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामण करीत आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group