देवळाली कॅम्प मध्ये अमली पदार्थ प्रकरणी तीन जणांविरूध्द गुन्हा
देवळाली कॅम्प मध्ये अमली पदार्थ प्रकरणी तीन जणांविरूध्द गुन्हा
img
दैनिक भ्रमर
प्रतिनिधी l देवळाली कॅम्प : अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. तसेच महाराष्ट्र प्रोव्हेन्शन कायद्यानुसार तीन जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून २४ लाख ४० हजाराचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ८ जानेवारीला पहाटे पाचच्या सुमारास देवळाली कॅम्प येथील लष्कराच्या प्रवेशव्दारा समोरील कॅथे कॉलनी येथे मुन्ना कोर या मजूराच्या खोलीत तीन जणांनी गांजा व अॅम्फेटामाईन हा अंमली पदार्थ विक्री करण्याचे उद्देशाने जवळ बाळगल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यांनी त्वरित कारवाई करून तीघांना अटक केली.

मुन्ना कल्लु कोल (४० वर्षे, मजूरी, मुळ गाव खोखम, जिल्हा सतना, मध्यप्रदेश), शांती मुन्ना कोल (३३ वर्षे, मजूरी, सतना मध्यप्रदेश), अमर मुन्ना कोल (१९, मजूरी,सतना, मध्यप्रदेश) अशी संशयितांची नावे आहेत. त्यांच्याविरूध्द एन.डी.पी.एस. कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. अॅफेटामाईन हा अंमली पदार्थ त्यांनी पांढ-या कागदामध्ये चौकोणी आकारात गुंडाळी करून खाकी रंगाच्या चिकट पट्टीचे आवरण लावून ठेवलेला होता. इलेक्टॉनिक वजन काट्यावर त्याचे वजन केले असता ते २६.५ ग्रॅम एवढे भरले. या अमली पदार्थाची किमत २४ लाख ४० हजार इतकी आहे.

तिन्ही संशयितांना न्यायालयात हजर केले असता त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. देवळाली कॅम्प पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली राजेंद्र गुंजाळ, शाम सिद्धुरे, प्रकाश शिंदे, राहुल बलकवडे यांच्या गुन्हे शोध पथकाने ही कारवाई केली.
Nashik |
इतर बातम्या
Join Whatsapp Group