नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- निवडणूक खर्चाची भरपाई म्हणून तीन लाख रुपये दिले नाहीत, तर तरुणाला जिवे ठार मारण्याची धमकी देणार्या इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रहित अनिल गाडे (रा. लक्ष्मीज्योत सोसायटी, जेलरोड, नाशिकरोड) हे काल (दि. 16) सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास सामनगाव पॉलिटेक्निक कॉलेजच्या जवळ मनपाच्या निवडणूक निकालासाठी गेले होते. त्यावेळी आरोपी विजय अशोक सिंग ऊर्फ शिंग्या (रा. जेलरोड, नाशिकरोड) याने फिर्यादीला जाणीवपूर्वक धक्का दिला, तसेच पवन पवार यांचा निवडणुकीत खूप खर्च झाला आहे.
त्यामुळे निवडणूक खर्चाची भरपाई म्हणून फिर्यादीकडे तीन लाख रुपये मागितले, तसेच पैसे दिले नाहीत, तर जिवे ठार मारण्याची धमकी देऊन आरोपीने त्याच्या हातातील चाकूने फिर्यादीच्या छातीवर वार करून दम दिला, तसेच मनपाच्या निवडणुकीत आशा चंद्रकांत पवार यांच्या झालेल्या पराभवाचा राग मनात धरून आरोपी विजय सिंग याने फिर्यादीला डोक्यात गोळी मारून जिवे ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात आरोपी विजय सिंगविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला .