नाशिक : ग्राहकाला दाखविण्यासाठी नेलेल्या कारची परस्पर विक्री
नाशिक : ग्राहकाला दाखविण्यासाठी नेलेल्या कारची परस्पर विक्री
img
वैष्णवी सांगळे
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- 16 लाख 50 हजार रुपयांचा व्यवहार ठरवून कार दाखविण्यास घेऊन जातो, असे सांगून नेलेल्या कारची परस्पर विक्री केल्याप्रकरणी एका जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, की फिर्यादी संदीप बारकू मांडवडे (रा. श्रीजी बिल्डिंग, सिरीन मेडोज्, गंगापूर रोड) यांच्या पत्नीच्या नावावर एमएच 15 जीए 2801 या क्रमांकाची टोयोटा कंपनीची इनोव्हा क्रिस्टा कार आहे. आरोपी राजेश पगार (रा. सिडको, नाशिक) याने फिर्यादीबरोबर कार खरेदी करण्याचा व्यवहार 16 लाख 50 हजार रुपयांमध्ये ठरविला.

 ही कार दाखविण्यासाठी घेऊन जातो, असे सांगून आरोपी राजेश पगार याने फिर्यादीचा विश्‍वास संपादन करून ही कार घेऊन गेला. त्यानंतर ही कार आरोपी पगार याने परस्पर थोरात नामक व्यक्तीला विक्री केली. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार खेताडे करीत आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group