धक्कादायक ! शरीरसंबंध टाळण्यासाठी नवऱ्यानं नवसाचं नाटक केलं , खरं कळताच पत्नीच्या पायाखालची वाळू सरकली
धक्कादायक ! शरीरसंबंध टाळण्यासाठी नवऱ्यानं नवसाचं नाटक केलं , खरं कळताच पत्नीच्या पायाखालची वाळू सरकली
img
वैष्णवी सांगळे
लग्न करताना भरपूर गोष्टी बघितल्या जातात. कुंडली व्यतिरिक्त बघितला जातो तो पैसा. म्हणजे मुलाकडे संपत्ती किती ? त्याचा स्वभाव कसा ? त्याच्या कुटुंबाचा स्वभाव कसा आणि मुलगी बघायचा असल्यास तिचाही स्वभाव कसा आणि बाकी बऱ्याच गोष्टी बघितल्या जातात. पण काही गोष्टी असतात ज्यावर लग्नाआधी परखड भाष्य करणं टाळलं जातं. आणि जेव्हा लग्नानंतर या गोष्टी समोर येतात तेव्हा धक्का बसतो. 

छत्रपती संभाजीनगर शहरात देखील अशीच काहीशी घटना घडली. कुटुंबीयांनी मुलाचे नपुंसकत्व लपवून थाटामाटात विवाह लावून दिला आणि एवढेच नाहीतर लग्नानंतर पतीने शरीरसंबंध टाळण्यासाठी नवस असल्याचे खोटे कारण पुढे करत विवाहितेला मानसिक त्रास सुद्धा दिला. याप्रकरणी पीडितेने पोलिसांत धाव घेतली आहे. 

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ३२ वर्षीय पीडित महिलेचा विवाह २० मे २०२५ रोजी झाला होता. विवाहानंतर पतीने तिच्याशी शरीरसंबंध ठेवण्यास स्पष्ट नकार दिला आणि त्याचे कारण नवस असल्याचे सांगितले. संशय वाढल्यानंतर पीडितेने पतीला वैद्यकीय उपचार घेण्याचा आग्रह धरला , मात्र यामुळे तिला मारहाण करण्यात आली. तपासात पुढे आलेल्या माहितीनुसार, पती नपुंसक असून ही बाब लग्नापूर्वीच सासरच्या मंडळींना माहित होती. तरीही ही महत्त्वाची माहिती लपवून तरुणीशी विवाह लावून देण्यात आला, असा गंभीर आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

ही फसवणूक इथेच थांबली नाही. सासरच्या मंडळींनी नाशिकमधील खुटवडनगर परिसरात फ्लॅट खरेदीसाठी १५ लाख रुपयांची मागणी केली. जोपर्यंत माहेरून पैसे येत नाहीत, तोपर्यंत शरीरसंबंध होणार नाहीत, असा जाच विवाहितेला देण्यात आल्याचे तिने तक्रारीत नमूद केले आहे. या काळात सासरच्यांनी तिचे सोन्याचे दागिने तसेच शैक्षणिक कागदपत्रेही बळजबरीने काढून घेतल्याचा आरोप आहे.

पीडितेने दिलेल्या तक्रारीत पतीवर आणखी एक खळबळजनक आरोप केला आहे. पतीचे त्याच्या जवळच्या मित्रासोबत समलैंगिक संबंध असल्याचे तिचे म्हणणे आहे. 6 सप्टेंबर 2025 रोजी तिला अत्यंत क्रूरपणे मारहाण करण्यात आली होती. सततच्या मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून अखेर पीडितेने पोलिसांत धाव घेतली. तिच्या फिर्यादीवरून छावणी पोलिसांनी पती, सासू, दीर, जाऊ, नणंद यांच्यासह एकूण 10 जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. 20 मे 2025 ते 21 जानेवारी 2026 या कालावधीत हा छळ आणि फसवणूक सुरू होती. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group