मध्यप्रदेशातून नाशिकमध्ये आलेला ६२ लाखांचा गुटखा जप्त, कन्नमवार पुलावर ट्रकवर छापा टाकत पोलिसांची कारवाई
मध्यप्रदेशातून नाशिकमध्ये आलेला ६२ लाखांचा गुटखा जप्त, कन्नमवार पुलावर ट्रकवर छापा टाकत पोलिसांची कारवाई
img
वैष्णवी सांगळे
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) : द्वारका परिसरात वाहनातून आलेला सुमारे 72 लाख 20 हजार रुपये किमतीचा अवैध गुटख्याचा साठा वाहनासह जप्त करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, की आरोपी सुरेश रामचंद्र बैरागी (रा. गोपाळ कॉलनी, झाबुआ, मध्य प्रदेश) हा वाहनचालक असून, तो एमएमएच 18 बीए 9888 या क्रमांकाच्या अशोक लेलॅण्ड कंपनीच्या वाहनामध्ये लक्झरी च्युइंग टोबॅको एका मोठ्या गोणीमध्ये 20 लाख 73 हजार 600 रुपये किमतीचे 16 छोटे बॉक्स, त्यामध्ये प्रत्येकी 45 पाकिटे अशा एकूण 16 गोण्या मिळून 11 हजार 520 पाकिटे, 41 लाख 47 हजार 200 रुपये किमतीच्या स्पेशल पानमसाला या सुगंधित तंबाखूच्या एका मोठ्या गोणीमध्ये चार पिशव्या, प्रत्येक पिशवीत 45 पाकिटे, अशा एकूण 64 गोण्या मिळून 11 हजार 520 बॉक्स असा एकूण 62 लाख 20 हजार 800 रुपये किमतीचा गुटखा वाहतूक करीत असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाला मिळाली.

त्यानुसार या पथकाने हा ट्रक द्वारका परिसरातील ट्रॅक्टर हाऊसजवळील सर्व्हिस रोड येथे आला असता पथकाने या ट्रकवर छापा टाकला. या कारवाईत अवैध गुटख्यासह ट्रक असा एकूण 72 लाख 20 हजार 800 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अन्न सुरक्षा अधिकारी सुवर्णा महाजन यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, त्यानुसार ट्रकचालक बैरागी, गुटखा उत्पादक कंपनी, अज्ञात वाहनमालक, वितरक राजेश शेट्टीयार व वाहतूकदार आशू गुप्ता व मध्य प्रदेशातील अज्ञात पुरवठादार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार करीत आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group