जय भवानी रोडवर पहाटे तरुणाचा खून
जय भवानी रोडवर पहाटे तरुणाचा खून
img
दैनिक भ्रमर
नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी) :- नाशिक शहर आणखी एका खूनाच्या घटनेने हादरले आहे. जय भवानी रोडवर आज पहाटे 5 वाजेच्या सुमारास एका 40 वर्षीय तरूणाचा कोयत्याने वार करून खून करण्यात आला.


‘या’ कफ सीरपच्या विक्री, वितरण अन् वापरावर अन्न व औषध प्रशासनाचे निर्बंध

अमोल मेश्राम असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. अमोल मेश्राम हा रोज पहाटे घराजवळील मंदिरात दर्शनासाठी जायचा. नेहमीप्रमाणे आज पहाटे 5 वाजेच्या सुमारास अमोल दर्शनासाठी गेला होता. बराच वेळ होऊनही तो घरी न आल्याने चिंताग्रस्त झालेल्या आईने बाहेर डोकावून पाहिले असता त्यांना अमोल जखमी अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसून आला. त्यांनी आरडाओरड केल्याने परिसरातील नागरिकांनी अमोलला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र घाव वर्मी लागल्याने तसेच अतिरक्तस्त्राव झाल्याने डॉक्टरांनी त्याला तपासून मयत घोषित केले.

डोकं फोडलं, रक्तबंबाळ केलं, भाजप खासदार अन् आमदारावर प्राणघातक हल्ला

अमोल हा जय भवानी रोडवरील साबरमती सोसायटीमध्ये आई-वडिलांसमवेत रहात होता. काही दिवसांपूर्वीच त्याची फारकत झाल्याचेही समजते. घटनेची माहिती मिळताच उपनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. हा खून नेमका कोणी आणि कशासाठी केला, हे मात्र समजू शकले नाही. पुढील तपास उपनगर पोलीस करीत आहेत. 


इतर बातम्या
Join Whatsapp Group