उत्तर प्रदेशातील गाझियाबाद मधून एक संतापजनक बातमी समोर आली आहे. क्षुल्लक कारणातून आई वडिलांनी ६ वर्षांच्या लेकीची हत्या केलीय. याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, नेहा (बदलेलं नाव) ही ६ वर्षीय चिमुकली आपल्या सावत्र आई आणि वडील (मनोज) सोबत राहत होती. मनोजने पहिले लग्न मुरादनगरमधील नेकपूर गावातील रहिवासी झहीर अहमद यांची मुलगी गुलजारशी केले होते. त्यांना दोन मुली आणि एक मुलगा होता. दरम्यान गुलजारच्या मृत्यूनंतर मनोजने दुसरं लग्न केलं.मनोजची दुसरी बायको ही मनोजच्या मुलांचा सतत छळ करायची.
दरम्यान सोमवारी ६ वर्षांच्या सियाने कपडे खराब केले म्हणून मधुराने आणि मनोजने तिला बेदम मारले. या मारहाणीत सिया बेशुद्ध झाली. तिला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, मात्र तिथे तिला मृत घोषित करण्यात आले. हा सगळा प्रकार गुलजारच्या माहेरच्यांना कळताच त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत असून नराधम आई बापांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.