चित्रपटाला लाजवेल अशी घटना ! ३ वर्षांनंतर महिलेच्या मृत्यूचं गूढ उकललं
चित्रपटाला लाजवेल अशी घटना ! ३ वर्षांनंतर महिलेच्या मृत्यूचं गूढ उकललं
img
वैष्णवी सांगळे
चित्रपटाला लाजवेल अशी घटना बदलापूर येथे घडली आहे. तब्बल तीन वर्षांनंतर एका महिलेच्या मृत्यू मागचं गूढ उकललं आहे.  महिलेचा मृत्यू नैसर्गिक कारणाने नसून विषारी साप चावल्याने झाला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिच्या पतीसह चौघांना अटक केली आहे. 

नेमकं प्रकरण काय ? 
१० जुलै २०२२ रोजी बदलापूर पूर्वेकडील उज्ज्वलदीप सोसायटी येथील घरात नीरजा रूपेश आंबेकर या महिलेचा मृत्यू झाला होता. त्यावेळी अपघाती मृत्यू म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला होता. सुरूवातीच्या तपासात कोणताही पुरावा पोलिसांच्या हाती सापडला नाही. परंतु, नंतर काही साक्षीदारांच्या जबाबामुळे पोलिसांना संशय येऊ लागला. यामुळे पोलिसांनी पुन्हा तपास सुरू केला.

तपासात असे दिसून आले की, मृत महिलेचा पती रूपेश आंबेकरचे नीरजासोबत वारंवार घरगुती कारणावरून वाद सुरू होते. याच वादांमुळे त्यानं पत्नीला संपवण्याचा निर्णय घेतला. त्याचे मित्र ऋषिकेश रमेश चाळके आणि कुणाल विश्वनाथ चौधरी देखील या कटात सामील होते. आरोपींनी आधी चेतन दुधाणे नावाच्या सर्प बचाव स्वयंसेवकाशी संपर्क साधला होता. त्याने आरोपींना साप दिला. नीरजा हिला त्याच सापाने चावा घेतला.

सापाने चावा घेतल्यामुळे महिलेचा मृत्यू झाला. ही बाब पोलीस तपास आणि तांत्रिक तपासात उघड झाले. तब्बल तीन वर्षांनंतर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून चारही आरोपींना अटक केली आहे. वरिष्ठ निरीक्षक नितीन पाटील यांनी सांगितले की, या प्रकरणाचा तपास सुरू आहे. सर्व आरोपींची कसून चौकशी केली जात आहे.
Murder |
इतर बातम्या
Join Whatsapp Group