प्रेमात कोण काय करेल काही नेम नाही. प्रेमात कोणी जीव देतो तर कोणी जीव घेतो. उत्तर प्रदेशातील कानपूर देहात येथे देखील एक धक्कादायक घटना घडली आहे. प्रेमात वेडा झालेल्या पुतण्याने चक्क काकाचा गळा चिरून हत्या केली आहे. कानपूर देहात येथील भोगणीपूर पोलिस स्टेशन परिसरातील अमरोधा शहरातील एका ट्रक ड्रायव्हरची त्याच्या पुतण्याने त्याच्या पत्नीच्या सांगण्यावरून हत्या केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणात पोलिसांनी त्याच्या पत्नी आणि पुतण्याला अटक केलीय.
अमरोधा शहरातील कटरा मोहल्ला येथे राहणारा चाळीस वर्षीय ट्रक चालक मोहम्मद कलीम याची २७ डिसेंबरच्या रात्री गळा दाबून हत्या करण्यात आली. दुसऱ्या दिवशी त्याचा मृतदेह त्याच्या घरात एका खाटेवर पडलेला आढळला. घटनास्थळी पोहोचल्यानंतर पोलिसांनी त्याची पत्नी शमा परवीनची चौकशी केली. तिने सांगितले की ते त्यांचे काका नूर मोहम्मद यांच्या मुलीच्या लग्नाला गेले होते. त्यानंतर पोलिसांनी ही आत्महत्या असल्याचे घोषित केले आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.
चौकशीनंतर त्याचा भाऊ शकील याने शनिवारी अज्ञात व्यक्तींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी कलीमची पत्नी आणि मृताचा पुतण्या समर शमीम उर्फ चांद बाबू यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. सुरुवातीला कबुली देण्यास नकार दिल्यानंतर, पोलिसांनी खाकीचा धाक दाखवल्यानंतर दोघांनीही गुन्हा कबूल केला.
चौकशीदरम्यान, त्याच्या पत्नीने सांगितले की त्यांचे लग्न तेरा वर्षांपूर्वी झाले होते आणि त्यांना तीन मुले होती. तिघांच्याही मृत्यूनंतर, तिच्या पतीने दारू पिण्यास सुरुवात केली होती. तिने तिच्या पुतण्या चांद बाबूकडून त्यांच्या तिसऱ्या मुलावर उपचार करण्यासाठी पैसे उधार घेतले होते. चांद बाबू मुंबईत राहत होता आणि वेल्डर म्हणून काम करत होता.
तो अधूनमधून अमरौधाला भेटायला येत असे. ती पैशासाठी चांद बाबूशी फोनवर बोलू लागली आणि बोलत बोलत त्यांच्यातील संवाद वाढत गेला आणि त्यांना एकमेकांवर प्रेम झाले. कलीमला हे कळताच त्याने त्यांना विरोध केला. आणि इथेच गेम पलटला. आणि त्यांनी त्याला संपवण्याचा कट रचला. त्याच्या कुटुंबातील एका लग्न समारंभात त्यांना संधी मिळाली आणि त्याच्या सांगण्यावरून चांद बाबूने कलीमचा गळा चिरून त्याची हत्या केली. सीओ भोगपूर संजय वर्मा यांनी सांगितले की चौकशी केल्यानंतर दोघांनाही न्यायालयात पाठवण्यात आले.