धक्कादायक ! संतापलेल्या आईने नवऱ्याचा राग लेकीवर काढला, दीड वर्षाच्या मुलीवर थेट...
धक्कादायक ! संतापलेल्या आईने नवऱ्याचा राग लेकीवर काढला, दीड वर्षाच्या मुलीवर थेट...
img
वैष्णवी सांगळे
लातूरमधून एक संतापजनक घटना समोर आली आहे. जन्मदात्या आईनेच संतापाच्या भरात असं काही कृत्य केलंय की तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल. पतीला कामावरून येण्यासाठी उशीर झाल्याने संतापलेल्या आईने पोटच्या दीड वर्षीय मुलीची चाकूने वार करत हत्या केलीय. ही खळबळजनक घटना लातूर शहरातील एमआयडीसी परिसरातील श्याम नगर भागात घडली आहे. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

प्राथमिक माहितीनुसार, मृत चिमुकलीचे ३४ वर्षीय वडील विक्रम जगन्नाथ चौगुले हे मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. सोमवारी पहाटेच्या सुमारास विक्रम हे कामाला गेले असता त्यांना घरी परतण्यासाठी काहीसा उशीर झाला. याच कारणावरून त्यांची पत्नी अश्विनी विक्रम चौगुले (वर्षे ३०) हिचा संताप अनावर झाला.

संतापलेल्या अश्विनीने घरातील धारदार चाकू आणला अन् आपल्या दीड वर्षांच्या निष्पाप मुलीवर अत्यंत क्रूरपणे सपासप वार केले. आरोपी आईने मुलीच्या तोंडावर, पोटावर, छातीवर, कमरेवर, डोक्यात आणि गुप्तांगावर चाकूने सपासप वार केले. आई करत असलेल्या क्रूर हल्ल्यात तो इवलुसा जीव विव्हळत होता. मात्र त्या वैरीण आईला तिची जरा देखील दया आली नाही.

या भीषण हल्ल्यात पीडित मुलगी गंभीर जखमी झाली आणि तिचा जागीच मृत्यू झाला. विक्रम हे घरी येताच त्यांना घडलेला प्रकार समजला. त्यांनी तातडीने पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी अश्विनी हिच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तसेच पुढील तपास सुरु आहे. दरम्यान या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
Murder |
इतर बातम्या
Join Whatsapp Group