लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद येथे धक्कादायक घटना समोर आली आहे. नवऱ्याच्या सतत दारू पिऊन त्रास देणाच्या सवयीला कंटाळून पत्नीने पतीचीच हत्या केली आहे.
सतत दारू पिऊन त्रास देणाऱ्या नवऱ्याची अर्चना गायकवाड हिने पती प्रशांत गायकवाड याची गळा दाबून अन् भिंतीवर आपटून हत्या केल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. प्रशांत आणि अर्चना यांच्यात काही दिवसांपासून कौटुंबिक वाद सुरू होता. याच वादातून अर्चना अनेक दिवस माहेरी गेली होती.
अर्चना संसार करण्यासाठी माघारी परतली तरीही नवऱ्याच्या वर्तनात कोणताही बदल झाला नाहीच. दारू पिऊन तो सतत मारायचा, त्यामुळे रागाच्या भरात अर्चनाने नवऱ्याचा खून केला. अन् बेशुद्ध अवस्थेत पती पडल्याचा बनाव रचला.मात्र पोलीस तपासात भिंतीवर आपटून, गळा आवळत हत्या केल्याचं उघड झालं. याप्रकरणी पत्नी अर्चना गायकवाड हिला अहमदपूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
लग्नानंतर नवरा दारू पिऊन सतत त्रास द्यायचा, मारायचा त्यामुळे अर्जना माहेरी गेली होती. पाच वर्षानंतर घरी परतल्यानंतरही नवऱ्याची सवय अन् स्वभाव बदलला नाही.त्यामुळे रागाच्या भरात पत्नीने नवऱ्याचा गळा आवळला, त्यानंतर भिंतीवर आपटून जीव घेतला. त्यानंतर नवरा दारू पिऊन मृत्यू झाल्याचा बनाव रचला.
प्रशांत गायकवाड हा सतत दारूचे व्यसन करायचा आणि यामुळेच तो बेशुद्ध झाल्याची माहिती अर्चना गायकवाड हिने स्वतःच्या दिराला दिली. रुग्णालयात उपचारासाठी प्रशांत याला घेऊन गेल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेत संशय बळवल्याने पोलिसांनी अधिकचा तपास केला. त्यानंतर स्वत:च्या पत्नीनेच भिंतीवर डोके आपटून गळा आवळून हत्या केल्याचं पोलीस तपासात उघड झाल आहे.