मुंबईमध्ये खळबळजनक वृत्त समोर आले आहे. मुंबईत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. विक्रोळीमध्ये गुरूवारी रात्री ही धक्कादायक घटना घडली आहे.
धक्का लागल्याच्या क्षुल्लक कारणावरून पदाधिकाऱ्याची हत्या करण्यात आली. सुरेंद्र धोंडुराम पाचाडकर असे हत्या झालेल्या शिवसैनिकाचे नाव आहे. विक्रोळी पार्कसाईट विभागात ते कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जायचे.
गुरुवार रात्री घाटकोपरच्या सीजीएस कॉलनी पाचाडकर यांची लोखंडी रॉडने हत्या झाली. या धक्कादायक घटनेने पार्कसाईट परिसरात संताप आणि हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी अमन श्रीराम वर्मा या १९ वर्षीय आरोपीला पोलिसांनी अवघ्या पाच तासात अटक केली आहे.