मुलीच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून मेसेज केला, भेटायला बोलावलं, अन पुढे १७ वर्षाच्या मुलासोबत मात्र धक्कादायक घडलं
मुलीच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून मेसेज केला, भेटायला बोलावलं, अन पुढे १७ वर्षाच्या मुलासोबत मात्र धक्कादायक घडलं
img
वैष्णवी सांगळे
पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. इन्स्टाग्रामवरती एका मुलीच्या माध्यमातून १७ वर्षीय मुलाला मेसेज करून कात्रज परिसरात भेटायला बोलावून घेतलं. त्यानंतर त्याला खेड शिवापूर येथे नेऊन त्याचा दगड व कोयत्याने वार करून निर्घृणपणे त्याला संपवलं. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे, या घटनेप्रकरणी दोन विधिसंघर्षित मुलांना ताब्यात घेण्यात आलं आहे. 



अमनसिंग सुरेद्रसिंह गच्चड (वय १७ वर्षे, रा. टिगरेनगर लेन नं १४, पुणे इन्टरनॅशनल स्कूलजवळ, विश्रांतवाडी), असे खून झालेल्या सतरा वर्षाच्या मुलाचे नाव आहे तर याप्रकरणी पोलिसांनी प्रथमेश चिंधू आढळ, वय १९ वर्षे, रा. उत्तमनगर पुणे, नागेश बालाजी धबाले, वय १९ वर्षे, रा. शिवणे, पुणे या दोघांना अटक केली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, अमनसिंग दि. २९ डिसेंबर रोजी मुलगा गाडी घेऊन घरातून गेला; पण तो परत न आल्याने त्याच्या आईने दि. ३१ डिसेंबर रोजी विश्रांतवाडी पोलिस स्टेशन येथे तक्रार दिली. त्यानंतर मुलाच्या मोबाइलचा सीडीआर व लोकेशनवरून विश्रांतवाडी पोलिस स्टेशन, तसेच गुन्हे शाखा, युनिट ३ पुणे शहरचे अधिकारी व अंमलदार यांनी दाखल गुन्ह्याचा तपास सुरू केला. मृत अमनसिंग गच्चड याला प्रथमेश चिंधू आढळ, नागेश बालाजी धबाले, दोन विधिसंघर्ष बालक व इतर मित्रांनी उत्तमनगर परिसरात नेले. 

त्यांच्याशी जुन्या भांडणावरून अमनचे अपहरण केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. आरोपी हे बेळगाव येथील असल्याचे कळल्यावर त्यांनी कर्नाटकात आरोपींचा शोध घेऊन ताब्यात घेतले. चौकशीत आरोपींनी एका मुलीच्या माध्यमातून त्याला कात्रज येथे बोलावून घेतले. त्यानंतर खेडशिवापूर परिसरात नेऊन दगड आणि कोयत्याने वार करून त्याच्या खूनाची कबुली दिली. पोलिस घटनेचा तपास करत आहेत.
Murder |
इतर बातम्या
Join Whatsapp Group