'तू बीच में आया तो'... रेल्वे स्टेशनबाहेरच रक्तरंजित थरार, चाकू आणि लोखंडी रॉड अन...
'तू बीच में आया तो'... रेल्वे स्टेशनबाहेरच रक्तरंजित थरार, चाकू आणि लोखंडी रॉड अन...
img
वैष्णवी सांगळे
डोंबिवली पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात आर. के. एस्टेट, कोपर रेल्वे स्टेशनजवळ रक्तरंजित थरार पहायला मिळालाय. जुन्या वादाच्या रागातून आरोपींनी ३७ वर्षीय नरेंद्र उर्फ काल्या भालचंद्र जाधव यांच्यावर कोयता, चाकू व लोखंडी रॉडने तब्बल ४० वार करत निर्घृण खून केलाय. १३ डिसेंबर रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी संगनमत करून नरेंद्र जाधव यांना तुला आता मारून टाकू अशी धमकी देत शिवीगाळ केली. त्यानंतर डोके, मान, गळा, छाती, पोट, पाठ तसेच हात-पायांवर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात नरेंद्र जाधव यांचा जागीच मृत्यू झाला. हल्ला थांबविण्यासाठी नरेंद्र याचा मित्र शुभम राजेश पांडे मध्ये पडला असता आरोपी आकाश बिराजदार याने 'तू बीच में आया तो तुझे खत्म कर देंगे' अशी धमकी देत त्यांच्या डोक्यावर चाकूने वार केला. 

या प्रकरणी डोंबिवली पोलीस ठाण्यात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा मार्ग काढण्यात आला. मोबाईल लोकेशनच्या मदतीने दिवा वेस्ट परिसरात छापा टाकून अवघ्या १२ तासांत मुख्य आरोपी आकाश गौरीशंकर बिराजदार वय २९ याच्यासह दिवाकर महेशचंद्र गुप्ता वय १८ आणि आलिफ शहादाब खान वय १८ या तिघांना अटक करण्यात आली.

पोलिस तपासात उघड झाले की, जुन्या वैमनस्यातूनच हा खून करण्यात आला. आरोपींनी कोयता व चाकूने नरेंद्र जाधव यांच्यावर ४० वार करून त्यांचा खून केला तसेच फिर्यादी शुभम पांडे यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. पुढील तपास डोंबिवली पोलीस करत असून इतर सहभागी आरोपींचा शोध सुरू आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group