राजस्थानातील अलवर येथे एक संतापजनक घटना घडली आहे. पोटच्या लेकानेच वृद्ध पालकांची निर्घृण हत्या केली आहे. ही भयंकर घटना अलवरमधील गोविंदगड येथे घडली आहे. ओमप्रकाश असे आरोपीचे नाव आहे.
ओमप्रकाश याने वडील हरिराम जाटव (वय वर्ष ७०) आणि आई शांती देवी (वय वर्ष ६५) यांची निर्घृण हत्या केली. रात्रीच्या वेळेस त्यानं कुऱ्हाडीने वार करून आई - वडिलांना संपवलं. नंतर आरोपी आईचे पैंजण घेऊन फरार झाला. दुसऱ्या दिवशी वृद्ध दांम्पत्य दिसत नसल्यामुळे शेजारी घरात गेले. तेव्हा हे प्रकरण उघडकीस आलं.
त्यानंतर शेजाऱ्यांनी जोडप्याच्या मोठ्या मुलाला त्याच्या आई - वडिलांच्या हत्येची माहिती दिली. मोहरपाल असे वृद्ध दांम्पत्याच्या मोठ्या मुलाचे नाव आहे. तो पत्नी आणि मुलांसह अलवरमध्ये राहतो. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच तपासाला सुरूवात केली.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी मद्यपी होता. दारूच्या नशेत त्याने पालकांवर हल्ला केला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच तपासाला सुरूवात केली.