रक्षकच असुरक्षित ! ASI पोलिसाची धारदार शस्त्राने हत्या
रक्षकच असुरक्षित ! ASI पोलिसाची धारदार शस्त्राने हत्या
img
वैष्णवी सांगळे
रक्षकच असुरक्षित असल्याचे अनेक प्रकार दिवसेंदिवस समोर येत आहे. बिहारमधील सिवान येथे घडलेल्या घटनेने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. दरौंदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सहाय्यक उपनिरीक्षक म्हणून तैनात असलेले अनिरूद्ध कुमार यांची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली.  नंतर त्यांचा मृतदेह निर्जनस्थळी फेकून देण्यात आला.



दरौंदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सहाय्यक उपनिरीक्षक म्हणून तैनात असलेले अनिरूद्ध कुमार यांची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली. अनिरूद्ध कुमार हे सिव्हिल ड्रेसमध्ये होते. ते रात्रीच्या सुमारास जात होते. त्याचवेळी धारदार शस्त्राने वार करत त्यांचा मृतदेह निर्जनस्थळी फेकून देण्यात आला.दरौंदा पोलीस स्टेशन परिसरात सिरसा नवका टोला येथे त्यांचा मृतदेह आढळून आला.



या घटनेनंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रूग्णालयात पाठवलं. या घटनेनंतर गावात एकच खळबळ उडाली. तसेच पोलीस विभागात शोककळा पसरली आहे. पोलीस सध्या आरोपीच्या शोधात आहेत. आरोपीने पोलिसावर नेमका हल्ला का केला ?  हत्या करण्यामागचं कारण काय? याचा तपास आता पोलिसांकडून सुरू आहे. 
Murder |
इतर बातम्या
Join Whatsapp Group