झारखंडातील पलामू जिल्ह्यातील रतनपूर गावात घडलेली घटना काळीज चिरणारी आहे. २५ वर्षीय मुलासाठी जन्मदाता बापच हैवान झाला. जन्मदात्या बापानेच पोटच्या गोळ्यावर हल्ला करत ठार केलंय. २५ वर्षीय युवकाचा त्याच्याच वडिलांनी गळा चिरून खून केलाय. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून गावकऱ्यांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण आहे.

झारखंडातील पलामू जिल्ह्यातील रतनपूर गवात शनिवारी रात्री एक भयंकर घटना घडली. २५ वर्षीय युवकाचा त्याच्याच वडिलांनी गळा चिरून खून केला.ही घटना पंकी पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली असून आरोपी वडील अमित ठाकूर सध्या फरार आहे. मृत युवकाचे नाव सुरज ठाकूर आहे. तो आपल्या अंथरुणावर झोपलेला असताना त्याच्या वडिलांनी अतिशय क्रूरपणे त्याचा गळा चिरला.
प्राथमिक तपासानुसार आरोपी मानसिकदृष्ट्या अस्थिर असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की अमित ठाकूरची पत्नी गेल्या वर्षभरापासून बेपत्ता आहे आणि त्या घटनेनंतर तो मनोवैज्ञानिक दृष्ट्या असंतुलित झाला असावा. या सर्व गोष्टींचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
पोलिस सूत्रांनी सांगितले की हत्येमागील नेमकी कारणे अद्याप स्पष्ट झालेली नाहीत. काही स्थानिकांचा अंदाज आहे की आरोपी एखाद्या कौटुंबिक वादामुळे किंवा मानसिक ताणामुळे रागाच्या भरात हे भयानक कृत्य केले. मात्र पोलिसांनी स्पष्ट केले आहे की सत्य लवकरच समोर आणले जाईल.