रुग्णालयात भीषण अग्नितांडव : आयसीयूमध्ये ८ रुग्णांचा दुर्दैवी अंत
रुग्णालयात भीषण अग्नितांडव : आयसीयूमध्ये ८ रुग्णांचा दुर्दैवी अंत
img
वैष्णवी सांगळे
राजस्थानची राजधानी जयपूरमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. जयपूरमधील सवाई मानसिंह (एसएमएस) रुग्णालयाच्या ट्रॉमा सेंटरच्या अतिदक्षता विभागात सोमवारी पहाटेच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत ८ रुग्णांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने रुग्णालय परिसरात एकच खळबळ उडाली. 


मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्रीच्या सुमारास एसएमएस रुग्णालयाच्या ट्रॉमा सेंटरच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या आयसीयू वॉर्डमध्ये अचानक आग लागली. काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केले आणि संपूर्ण वॉर्ड धुराच्या लोटात वेढला गेला. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. यावेळी आयसीयूमध्ये ११ गंभीर रुग्ण व्हेंटिलेटरवर होते.

चाललंय काय ? ज्याच्यावर सुरक्षेची जबाबदारी तोही सुरक्षित नाही , किरकोळ कारणातून पोलिसावरच हल्ला

आग लागल्याचे समजताच रुग्णालयातील कर्मचारी आणि रुग्णांच्या नातेवाईकांनी धावपळ करत रुग्णांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू केले. काही रुग्णांना तर बेडसहित ऑक्सिजन सिलेंडरसह बाहेर आणण्यात आले. या धावपळीत रुग्णालयाच्या परिसरात एकच गोंधळ उडाला होता. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि त्यांनी तातडीने आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू केले.

अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. या दुर्दैवी घटनेत आयसीयूमध्ये उपचार घेत असलेल्या ८ रुग्णांना आपला जीव गमवावा लागला. धुरामुळे श्वास गुदमरल्याने आणि आगीच्या झळा बसल्याने या रुग्णांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय, ३ रुग्णांची प्रकृती चिंताजनक असून, त्यांना दुसऱ्या वॉर्डमध्ये हलवण्यात आले आहे. त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू आहेत.


इतर बातम्या
Join Whatsapp Group