माजी केंद्रीय मंत्री डॉ. गिरीजा व्यास घरात भाजल्याने गंभीर जखमी, नेमकं काय घडलं ?
माजी केंद्रीय मंत्री डॉ. गिरीजा व्यास घरात भाजल्याने गंभीर जखमी, नेमकं काय घडलं ?
img
DB
राजस्थानच्या उदयपुर येथून मोठी बातमी समोर येत आहे. काँग्रेसच्या नेत्या माजी केंद्रीय मंत्री डॉ. गिरिजा व्यास यांच्या बाबतीत विचित्र अपघात घडला आहे.  

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की , डॉ. गिरिजा व्यास या  घरातच पूजा करताना भाजून गंभीर जखमी झाल्या आहेत. त्या नियमितपणे पूजा करत असताना पणतीच्या ज्योतीने त्यांच्या ओढणीने अचानक पेट घेतल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना आधी उदयपूर येथील अमेरिकन रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर त्यांचे कुटुंबिय त्यांना अहमदाबादला घेऊन गेले आहेत.

माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसच्या नेत्या डॉ. गिरिजा व्यास घरातच भाजल्या गेल्या आहेत. त्या नेहमी प्रमाणे पूजा करीत होत्या. त्यावेळी त्यांच्या ओढणीने पेट घेतला आणि त्या गंभीररित्या भाजल्या गेल्या.

गणगौरच्या पूजे दरम्यान ही घटना घडली आहे. त्यांना आधी नजिकच्या उदयपूरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. नंतर त्यांना त्यांच्या कुटुंबियांनी अहमदाबादला रवाना केले आहे.
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group