चीनमधील हेनान प्रांतात हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. एका प्रायमरी बोर्डिंग स्कूलच्या वसतिगृहात भीषण आग लागली. यात विद्यार्थ्यांसह १३ जणांचा होरपळून मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार यानशानपु गावातील स्थानिकांनी शुक्रवारी रात्री ११ वाजता यिंगकाई स्कूलमध्ये आग लागल्याची माहिती दिली. आगीच्या घटनेची माहिती मिळताच बचावपथक घटनास्थळी पोहोचले. रात्री ११ वाजून ३८ मिनिटांनी आग आटोक्यात आणण्यात यंत्रणेला यश आले.
या आगीत किती विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला हे स्पष्ट होऊ शकले नाही. मात्र, एकूण १३ जणांचा यात होरपळून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
या आगीच्या दुर्घटनेत एक व्यक्ती गंभीररित्या भाजला आहे. त्याच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. स्थानिक मीडियानुसार, शाळेच्या संचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.