अग्नीतांडव! सचिन तेंडुलकर क्रिकेट अकॅडमी शेजारील इमारतीला भीषण आग, फायर ब्रिगेड घटनास्थळी दाखल
अग्नीतांडव! सचिन तेंडुलकर क्रिकेट अकॅडमी शेजारील इमारतीला भीषण आग, फायर ब्रिगेड घटनास्थळी दाखल
img
DB
मुंबई : मुंबईतील आगीच्या घटनांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. कांदिवली महावीरनगर येथील वीणा संतूर बिल्डिंगमध्ये भीषण आग लागली. या भीषण आगीत  दोन जणांचा होरपळून मृत्यू  झाला आहे. तर तीनजण जखमी झालेत.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, होरपळून मृत्यू झालेल्यांमध्ये एका आठ वर्षाच्या चिमुकल्याचा समावेश आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. इमारतीच्या पहिल्या मजल्यावर ही आग लागली आगीचे प्रचंड लोट आणि धूर मोठ्या प्रमाणावर दिसत आहेत.

आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलं असून, सध्या कुलिंगचं काम सुरु आहे. आगीचे कारण अद्याप समोर आले आहे. या आगीमुळं नागरिकांचं मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान, ही आग नेमकी कशी लागली याची माहिती अद्याप मिळू शकली नाही. स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक याचा तपास करत आहेत.  

इतर बातम्या
Join Whatsapp Group